Sukanya Samriddhi Yojana in Marathi 2024

Sukanya Samriddhi Yojana In Marathi

Sukanya Samriddhi Yojana : मुलींचे भवितव्य उज्ज्वल आणि सुरक्षित व्हावे यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या बचत योजना राबविल्या जातात. या बचत योजनांवर आयकर सूट आणि उच्च व्याजदर प्रदान केले जातात. जेणेकरून लोकांना या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळून मुलींचे भविष्य सुरक्षित करता येईल. आज आम्ही तुम्हाला केंद्र सरकारने सुरू केलेल्या अशाच एका योजनेशी संबंधित माहिती देणार आहोत. ज्याचे नाव Sukanya Samriddhi Yojana आहे. या योजनेद्वारे लाभार्थी मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी एकरकमी रक्कम गुंतवू शकतो. या लेखाद्वारे तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती मिळेल. याशिवाय, हा लेख वाचून तुम्ही पात्रता, महत्त्वाची कागदपत्रे आणि अर्जाशी संबंधित माहिती देखील मिळवू शकाल.

Sukanya Samriddhi yojana अंतर्गत, एका कुटुंबातील फक्त दोन मुलींना लाभ मिळू शकतो. एका कुटुंबात 2 पेक्षा जास्त मुली असतील तर त्या कुटुंबातील फक्त दोन मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येईल. परंतु जर एखाद्या कुटुंबात जुळ्या मुली असतील तर त्यांना या योजनेचा लाभ स्वतंत्रपणे मिळेल म्हणजेच त्या कुटुंबातील तीन मुली लाभ घेऊ शकतील. जुळ्या मुलींची संख्या समान असेल परंतु त्यांना स्वतंत्रपणे लाभ दिला जाईल.

Sukanya Samriddhi Yojana

वाचा- लाडकी बहिण योजनेसाठी अप्लाय करा.

Sukanya Samriddhi Yojana चे फायदे :

  • कमीत-कमी २५० रुपये भरून खाते उघडता येते.
  • वर्षाला किमान २५० रुपये आणि कमाल १ लाख ५० हजार रुपये गुंतवणूक करता येते.
  • या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी २१ वर्षे आहेत.
  • सध्या , सुकन्या समृद्धी योजनेचे(SSY) अनेक कर (Tax) लाभ आहेत.
  • लघु बचत योजनांमध्ये सर्वाधिक व्याजदर याचे आहे. (७.६% इतके)
  • जमा केलेली मुद्दल, संपूर्ण कालावधीत मिळालेले व्याज आणि मॅच्युरिटी लाभ कलम 80C अंतर्गत करमुक्त आहेत.
  • हे खाते भारतामध्ये एका पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकेमध्ये ट्रान्सफर करता येते.
  • मॅच्युरिटी नंतर खाते बंद न केल्यास मुदतीनंतरही जमा रकमेवर व्याज मिळत राहते.
  • मुलीचे वय १८ वर्षे झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी ५०% रक्कम काढण्याची परवानगी आहे.
  • खाते चालू केल्यानंतर फक्त पंधरा वर्षापर्यंत पैसे भरायचे असतात.

सुकन्या समृद्धी योजना साठी पात्रता आणि अटी :

  • मुलीचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असावे.
  • मुलीच्या एका पालकाद्वारे मुलीच्या नावाने खाते उघडता येते.
  • या योजनेअंतर्गत प्रत्येक खातेदाराचे एकच खाते असावे.
  • एका कुटुंबातील फक्त दोनच मुलींचे खाते उघडले जाऊ शकते, परंतु जर पहिली मुलगी असेल आणि दुसऱ्या प्रसुती वेळी जुळ्या मुलींचा जन्म झाला असेल, तसेच पहिल्या प्रसूती वेळेस जर तिळ्या मुलींचा जन्म झाला असेल तर अशा परिस्थितीत त्या तीनही मुलींच्या नावे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुलींच्या जन्म प्रमाणपत्रासह पालकांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्यास उघडता येऊ शकते.

सुकन्या समृद्धी योजना साठी अर्ज प्रक्रिया:

Sukanya Samriddhi Yojana खाते कोणत्याही सहभागी बँक अथवा पोस्ट ऑफिस शाखेमध्ये उघडले जाऊ शकते त्यासाठी खाली दिलेल्या गोष्टींचा अवलंब करा.

  • तुम्हाला ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडायचे आहे त्या ठिकाणी जा.
  • तिथून सुकन्या समृद्धी योजना चा फॉर्म घ्या आणि आवश्यक माहिती सह फॉर्म भरा आणि सोबत लागणारी कागदपत्रांची झेरॉक्स जोडा.
  • कमीत कमी २६० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पण पण दीड लाखाच्या आत, इतके रक्कम तुम्ही भरणार असाल ती फॉर्म मध्ये आणि स्लिप वर लिहा.
  • तुमचा फॉर्म आणि पैसे जमा केल्यानंतर तुम्हाला त्याची पावती दिली जाईल व तुमच्या मुलीच्या नावे खाते चालू केले जाईल.
  • या खात्यासाठी तुम्हाला एक पासबुक सुद्धा दिले जाईल

सुकन्या समृद्धी योजना व्याजदर:

सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर हा भारताच्या अर्थव्यवस्थेतील बदलांवर कमी-जास्त होत असतो. केंद्र सरकार या योजनेचे व्याजदर ठरवते आणि दर तिमाही सुधारित करते. या योजनेच्या सुरुवातीला म्हणजेच २०१५ मध्ये ९.१% इतके व्याजदर देण्यात आले होते. या योजनेचा व्याजदर २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये ७.६% एवढा होता आता तो २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी ८% करण्यात आला आहे. हा १ एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आला आहे. सुरुवाती पेक्षा सध्याच्या व्याजदर कमी आहे.

मागील काही वर्षांतील व्याजदराचा इतिहास बघूया:

कालावधीव्याजदर
एप्रिल – जून २०२०७.६%
जानेवारी – मार्च २०२०८.४%
जुलै – सप्टेंबर २०२९८.४%
एप्रिल – जून २०१९८.५%
जानेवारी – मार्च २०१९८.५%
ऑक्टोबर – डिसेंबर २०१८८.५%
जुलै – सप्टेंबर २०१८८.१%
एप्रिल – जून २०१८८.१%
जानेवारी – मार्च २०१८८.१%
ऑक्टोबर – डिसेंबर २०१७८.३%
जुलै – सप्टेंबर २०१७८.३%
एप्रिल – जून २०१७८.४%

Sukanya Samriddhi Yojana साठी आवश्यक कागदपत्रे:

  • मुलीचा जन्म दाखला.
  • पालकांचा फोटो असलेले ओळखपत्र उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी.
  • पालकांचा पत्त्याचा पुरावा उदा. रेशन कार्ड, लाईट बिल.
  • सुकन्या समृद्धी योजना फॉर्म.
  • जन्माच्या एका आदेशानुसार अनेक मुलांचा जन्म झाल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र, व सोबत पालकांचे प्रतिज्ञापत्र.
अधिकृत वेबसाईटक्लिक करा

सतत विचारले जाणारे प्रश्न | FAQ

२) सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक कमीत कमी किती पैसे भरता येतात?
उत्तर – सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक कमीत कमी २५० रुपये भरता येतात.

३) सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक जास्तीत जास्त किती पैसे भरता येतात?
उत्तर – सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरता येतात.

४) सुकन्या समृद्धी खाते कोण उघडू शकतो?
उत्तर – मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी खाते उघडू शकतात.

५) अनिवासी भारतीय सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकतात का?
उत्तर – अजून पर्यंत या विषयाबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा आलेली नाही, त्यामुळे अनिवासी भारतीय सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

६) खातेधारकाचा मृत्यू झालास काय होते?
उत्तर – खातेधारक मुलीचा मृत्यू झाला असे खाते बंद केले जाते आणि तिच्या पालकांना देय रक्कम दिली जाते.

७) खातेधारकाच्या पालकांचा मृत्यू झाल्यास काय होते?
उत्तर – खातेधारक मुलीच्या पालकांचा मृत्यू झाल्यास, ही योजना एक तर बंद केली जाते आणि मिळणारी रक्कम कुटुंबाला दिली जाते. किंवा ही योजना मॅच्युरिटी कालावधीपर्यंत जमा केलेल्या रकमेसह चालू ठेवली जाते आणि मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत जमा रकमेवर व्याज मिळत राहते नंतर त्या मुलीला सर्व रक्कम दिली जाते.

८) मी माझे बचत खाते सुकन्या समृद्धी योजना खात्यात रूपांतरित करू शकतो का?

उत्तर – नाही, सध्या अशा प्रकारची कोणतीही सुविधा नाही सुकन्या समृद्धी योजना हे एक स्वतंत्र खाते आहे.

९) मी माझ्या सुकन्या समृद्धी खात्यातून मॅच्युरिटी आधी पैसे काढू शकते का?
उत्तर – नाही परंतु मुलगी १८ वर्षांची झाली असेल आणि तिच्या शैक्षणिक खर्चासाठी पैशांची आवश्यकता असेल तर अशावेळी मात्र ५०% रक्कम काढता येते.

Yoast SEO

Rank Math

१०) सुकन्या समृद्धी योजना संपूर्ण भारतात चालू आहे का?
उत्तर – होय, सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची योजना असल्याने ती भारतातील प्रत्येक राज्यात चालू आहे.

११) मी माझ्या मुलीसाठी एकूण किती खाते उघडू शकतो?
उत्तर – एका मुलीसाठी फक्त एकच सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्याची परवानगी आहे.

१२) मी माझ्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी खाते कुठे उघडू शकतो?
उत्तर – सुकन्या समृद्धी खाते तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये किंवा अधिकृत बँकांमध्ये उघडू शकता उदाहरणार्थ- एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी, पंजाब नॅशनल बँक, इत्यादी.

१३) सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर फिक्स आहे का?
उत्तर – नाही, केंद्र सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेनुसार या योजनेचा व्याजदराचा अभ्यास करून दर तिमाहित सुधारणा करत असते.

१४) सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलीचे जन्मापासून किती वर्षापर्यंत खाते उघडता येतो?

उत्तर – सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलीचे जन्मापासून १० वर्षांपर्यंत खाते उघडता येते. 

इतर योजनांची माहिती वाचा.